श्रीराम मिश्र (मणक्काल् नम्बि)

श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः

गूरूपरंपरा उपक्रमणिका

<< श्री पुण्डरिकाक्ष

पूर्वीच्या परिच्छेदात ओराण् वऴि गुरु परंपरेत सातवे आचार्य “उय्यकोण्डार्” स्वामींच्या जीवनाचा संक्षिप्त परिचय दिला होता. या मालिकेत आपण ओराण् वऴि अंतर्गत आठवे आचार्य (श्रीराम मिश्र/मणक्काल् नम्बि) यांच्या जीवनावर संक्षिप्त प्रकाश टाकणार आहोत.

श्रीराम मिश्र (मणक्काल् नम्बि), मणक्काल्

तिरुनक्षत्र  :  माघ मास , माघ नक्षत्र

अवतार स्थळ  : मणक्काल्

(श्रीरंगमजवळ कावेरी नदीच्या काठावर असलेले एक छोटेसे गाव – मणक्काल्)

आचार्य  : उय्यकोण्डार

शिष्यगण : यामुनाचार्य  (आळवन्दार), तिरुवरंगपेरुमाळ् अरयर् (यामुनाचार्य स्वामी यांचे पुत्र), दैवतुक्करसु नम्बि, पिळ्ळै अरसु नम्बि, सिरु पुळ्ळूरुडैयार् पिळ्ळै, तिरुमालिरुन्चोलै दासर, वंगिपुरत्तु आय्चि

श्रीराम मिश्र यांना श्रीराममिश्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांचा जन्म मणक्काल नावाच्या एका लहान गावात झाला. त्यांची प्रसिद्धी संप्रदायामध्ये श्रीराम मिश्र या नावाने झाली. ते आपल्या आचार्य (उय्यकोण्डार) यांच्या सेवेत बारा वर्ष होते. या बारा वर्षांच्या दरम्यान त्यांच्या आचार्यांच्या पत्नीचे परमपदास प्रस्थान झाले. त्यानंतर श्रीराम मिश्र यांनी स्वतः आपल्या आचार्यांच्या घराची (तिरुमाळिगै) आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली.

आपल्या आचार्य निष्ठा आणि घर कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचे उदाहरण देत, एक घटना खूप चर्चित आहे. एकदा आचार्य उय्यकोण्डार यांच्या मुली कावेरी नदीच्या तीरावरून परत येत होत्या, तेव्हा रस्त्यातील चिखलामुळे त्या पुढे जाऊ शकत नव्हत्या आणि तिथेच थांबल्या होत्या. हे पाहून श्रीराम मिश्र छातीच्या बलाने चिखलावर झोपतात आणि आपल्या आचार्यांच्या मुलींना त्यांच्या पाठीवर चालत जाण्यास सांगतात. जेव्हा त्यांच्या आचार्य उय्यकोण्डारांना या घटनेची माहिती मिळते, तेव्हा ते मणक्काल् नम्बिंच्या आचार्य चरणांबद्दल भक्ती आणि जबाबदारी सांभाळण्याच्या क्षमतेचा विचार करून अत्यंत आनंदी झाले आणि मणक्काल् नम्बिंना विचारले – ‘हे श्रीराम मिश्र ! तुझी इच्छा काय आहे?’ हे विचारले असता श्रीराम मिश्र म्हणतात – ‘मी सतत आपली सेवा करण्यास तत्पर राहो हीच माझी इच्छा आहे.’

उय्यकोंडार अतिशय आनंदाने मणक्काल् नम्बिंना द्वयमहामंत्राचे उपदेश पुन्हा करतात. (संप्रदायात अशी मान्यता आहे की जेव्हा श्रीवैष्णवाचार्य आनंदी असतात तेव्हा ते आपल्या शिष्याला द्वयमहामंत्राचे उपदेश करतात).

उय्यकोण्डार त्यांच्या मृत्यूच्या काळात श्रीराम मिश्र यांना आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करतात आणि श्रीराम मिश्र यांना आपल्या अंतिम उपदेशात नाथमुनि स्वामींनी दिलेल्या वचनानुसार त्यांच्या नातू, ईश्वरमुनि यांचा पुत्र, यामुनाचार्य यांना सदधर्ममार्गावर प्रशिक्षण देऊन, आपल्या सत्संप्रदायाचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यास सांगतात.

ईश्वरमुनि यांच्या पोटी यमुनैतुरैवरांचा (यामुनाचार्यांचा जन्म नाव) जन्म होतो, श्रीराम मिश्र, यमुनैतुरैवरांचा संप्रदायानुसार पंच-संस्कार दीक्षेचे आयोजन करतात (संप्रदायाच्या प्रथेनुसार शंख आणि चक्र देणे म्हणजेच पंच संस्कार), बाळाचे नावकरण संस्कार करतात (जो अकराव्या दिवशी होतो – यावेळीही केला जात असे). त्या काळात बाल्यावस्थेतच बाळाला तिरुमंत्राचे उपदेश देऊन, त्याचा गुप्त अर्थ समजावून मनन करण्यास सांगितले जात असे, जेव्हा बालक यौवन वयात पोहोचत असे, तेव्हा त्याला देवाच्या मूर्ती / शालग्रामाची पूजा (तिरुवाराधनम्) शिकवली जात असे.

यमुनैत्तुरैवर लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि बुद्धिमान होते. हेच कारण आहे की ते आळवन्दार बनले (म्हणजे जे रक्षणासाठी आलेले असतात – हे आळवन्दार यांच्या व्यक्तिमत्त्वातून समजू शकते). त्यांच्या ह्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी कोलाहल पंडिताला शास्त्रार्थात हरवले, तत्कालीन राजाकडून अर्धे राज्य पारितोषक स्वरुपात मिळवले आणि आळवन्दार हे नाव सुद्धा मिळवले. त्यानंतर यमुनैत्तुरैवर राज्याच्या संचालनात व्यस्त झाले, अशा प्रकारे ते या भौतिक जगतातील संसारात इतके गुंतून गेले की स्वतःच्या पृथ्वीवरच्या अवतरणाचे कारण विसरले. श्रीराम मिश्र हे सगळं पाहून अत्यंत दुःखी झाले आणि आपल्या आचार्यांचे वचन आठवून त्यांना (यामुनाचार्य) भगवद्भक्तीच्या सत्य मार्गाचे दर्शन घडून द्यायचे ठरवले.

याच सद्भावनेने श्रीराम मिश्र जेव्हां यामुनाचार्य यांच्या भेटीस गेले, तेव्हा मुख्यद्वारपालकाने त्यांना रोखले. मणक्काल् नम्बिंची सद्भावना यामुनाचार्य यांच्याकडे (जे त्यांच्याचे आवडते शिष्य होते) आणि मजबूत झाली आणि या भावनेने त्यांनी गुपचूप राजप्रासादाच्या मुख्य स्वयंपाकासोबत मैत्री केली, म्हणाले की दररोज तुमच्या राजाला (आळवन्दार /यामुनाचार्य) हिरव्या भाजी खायला द्या आणि ती मी दररोज आणून देईन, ज्यामुळे तुमच्या राजाचे आरोग्य चांगले राहील. त्यानंतर यामुनाचार्य यांना दररोज जेवणात हिरवी भाजी मिळत राहिली, ज्यामुळे त्यांचे हिरव्या भाजीतले आकर्षण आणखी वाढले. त्यांच्यात आणि त्यांच्या विचारांत हळूहळू बदल येऊ लागले. मग अचानक एका दिवशी जेवणात हिरवी भाजी न मिळाल्याने यामुनाचार्य त्यांच्या स्वयंपाक्यांकडे विचारतात, “आज हिरवी भाजी का नाही बनवली?” तर मुख्य स्वयंपाकी म्हणतो, ‘एक श्रीवैष्णव येत असत, त्यांच्या विनंतीनुसार आम्ही त्यांची हिरवी भाजी रोज तुम्हाला वाढत होतो, पण आज ते आले नाहीत, त्यामुळे आज हिरवी भाजी वाढली नाही.’ हे ऐकून यामुनाचार्य त्यांच्या द्वारपालकाला आदेश देतात की श्रीवैष्णवांना त्यांच्या दरबारात आमंत्रित करावे. या प्रकारे निमंत्रण मिळाल्यावर अतिशय आनंदित श्रीराम मिश्र यामुनाचार्य यांना भेटायला राजदरबारात जातात. तिथे यामुनाचार्य मणक्काल् नम्बिंना विचारतात की त्यांना पैशांची गरज आहे का, तेव्हा श्रीराम मिश्र म्हणतात की माझ्याकडे श्रीनाथमुनि यांनी प्रसाद म्हणून दिलेले अमूल्य धन आहे जे मी तुम्हाला (यामुनाचार्य) देऊ इच्छितो. हे ऐकून अतिशय प्रसन्न यामुनाचार्य स्वामी आपल्या अनुयायांना आज्ञा देतात की कधीही श्रीराम मिश्र आले तरी त्यांना लगेच आत पाठवा.

अशा प्रकारे विशेष कृपेने श्रीराम मिश्र, त्यांना भगवद्गीतेचा सदुपदेश देतात जे ऐकून आळवन्दारांमध्ये बदल होऊ लागतो. मणक्काल् नम्बिंच्या कृपेने मिळालेल्या विशेष ज्ञानाने बदललेल्या यामुनाचार्य त्यांच्याकडे विचारतात – “भगवद्गीतेचे सारांश काय आहे ज्यातून भगवंताचे दर्शन होते?” त्यावर श्रीराम मिश्र त्यांना चरमश्लोकाचे गोपनीय रहस्य सांगतात. यानंतर श्रीराम मिश्र आळवन्दारांना तिरुवरंगम मध्ये घेऊन जातात आणि भगवानांच्या दिव्य मंगळ (अर्चामूर्ति) स्वरूपाचे दर्शन घडवतात. तिरुवरंगममध्ये भगवान श्री रंगनाथांचे दिव्य स्वरूप पाहून यामुनाचार्य स्वामी भौतिक जगाशी संबंधित सर्व बंधने पूर्णत: सोडतात. श्रीराम मिश्र आपल्या वैकुण्ठ गमनापूर्वी आळवन्दारांना :-

1) श्रीनाथमुनि यांच्या विषयी नेहमी विचार करण्याचे सांगितले जाते.

2) त्यांना आपल्या नंतर संप्रदायाचे उत्तरदायित्व सुपूर्द केले जाते.

3) भविष्यात त्यांसारख्या एका परिवर्तनशीलाचार्याला संप्रदायाचे उत्तरदायित्व द्यायची घोषणा करायला सांगितले जाते.

आपल्या आचार्य मणक्काल् नम्बिंच्या आदेशानुसार आणि त्यांना दिलेल्या वचनानुसार यामुनाचार्य स्वामी यांनी श्री रामानुजाचार्य यांना भविष्यकाळातील प्रवर्तकाचार्य म्हणून घोषित केले. म्हणूनच आमच्या सत्तसंप्रदायाचे मार्गदर्शक श्रीरामानुजाचार्य झाले.

अशाप्रकारे आपल्या आचार्यांना दिलेल्या वचनाचे पालन करून श्रीराम मिश्र परमपदास पोहोचले ।

श्रीराम मिश्र यांचे तनियन :-

अयत्नतो यौमुनम् आत्म दासम् अलर्क्क पत्रार्प्पण निष्क्रयेण
यः क्रीत्वानास्तित यौवराज्यम् नमामितम् राममेय सत्वम् ॥

आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/25/manakkal-nambi-english/

संगृहीत – https://acharyas.koyil.org/

प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org

Leave a Comment