गूरूपरंपरा उपक्रमणिका – २

श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः

पूर्व लेखनात (https://acharyas.koyil.org/index.php/2026/06/23/introduction-marathi/) आपण गुरूपरंपराचे विवरण करायला आरंभ केला.

श्रियःपती (श्री महालक्ष्मीचे पती) असलेले भगवान (एम्पेरुमान) श्रीमन् नारायण, जे अनंत, गरूड, विश्वक्सेन इत्यादी नित्यसुरींद्वारे सेवा केली जातात आणि आपल्या दिव्य महिषींसह (दिव्य पत्नी – श्री, भू, नीळा देवी) श्रीवैकुंठामध्ये शाश्वत निवास करतात, ते कल्याणकारी गुणांनी परिपूर्ण आहेत. श्रीवैकुंठ (परमपद) हे शाश्वत आनंदाचे ठिकाण आहे, परंतु भगवंत तिथे आनंद घेत असतानाही, त्यांचे हृदय संसारातील जीवात्मांकडे लागलेले असते (कारण ते तिथे दुःख भोगत आहेत). सर्व जीवात्मा, अर्थात अ) नित्य – जे नेहमी परमपदात असतात (कर्मामुळे कधीही संसारात आले नाहीत), ब) मुक्त – जे संसारात होते पण आता मुक्त झाले आहेत आणि क) बद्ध – जे कर्माने बांधले जाऊन संसारात आहेत, हे सर्व भगवान चे अधीन आहेत आणि त्यांचे भगवानशी समान नाते आहे (मुख्यतः – स्वामी-सेवक आणि पिता-पुत्र असे नाते). केवळ याच नात्यामुळे भगवान सर्व बद्ध जीवात्मांना श्रीवैकुंठात आणण्यासाठी आणि त्यांना शाश्वत कैंकर्यामध्ये (दिव्य सेवेमध्ये) सामावून घेण्यासाठी सतत सहाय्य करत असतात.

शास्त्रात स्पष्ट केल्या प्रमाणे, मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याकडे वास्तविक ज्ञान असणे आवश्यक आहे. वास्तविक ज्ञान स्पष्टपणे आणि नेमकेपणाने ‘रहस्य ग्रंथात’ कळवले आहे. जो कोणी संसाराचा बंधनातून एका जीवात्माला मुक्त करणारे हे वास्तविक ज्ञान प्रदान करतो, त्याला आचार्य असे म्हटले जाते. आचार्याचे पद इतकी गौरवशाली असल्याने भगवान स्वतःना आचार्य बनण्याची इच्छा असते. म्हणून ते प्रथम आचार्य बनले. आपल्या पूर्वाचार्यांद्वारे समजावले गेले आहे कि भगवान ने ३ ठिकाणी आचार्य पद घेतले: 

  • बद्रिकाश्रमात भगवान नी नारायण ऋषींचा (आचार्य) अवतार घेऊन तिरुमंत्राची (अष्टाक्षरी मंत्र) उपदेश आपल्याच अवतार नर ऋषी (शिष्य) यांना दिले. 
  • भगवान नी ‘द्वय महामंत्र’ याचा उपदेश माता श्रीमहालक्ष्मी (पिराट्टि, श्रीदेवी)  यांना विष्णु लोकेत दिला (आपल्या श्रीवैष्णव गुरूपरंपराचा आरंभ करून दिला).
  • पार्थाचा सारथि (कृष्ण) होऊन भगवान‌ ने अर्जुनाला गीता द्वारा चर्म श्लोकाचा उपदेश कुरुक्षेत्रावर दिला. 

श्री वैष्णव संप्रदायाची “संप्रदाय प्रवर्तक” (ओराण् वऴि) गुरू परंपरा थेट श्रीरंगम् चे दिव्य दांपत्य, म्हणजे श्री रंगनाथ अर्थात पॆरिय पॆरुमाळ् (श्रीमन्नारयण) आणि श्री रंगनायकी अर्थात पॆरिय पिराट्टि (श्रीमहालक्ष्मी) यांच्यापासून आरंभ  होते आणि या अचूक क्रमाने पुढे जाते:

सम्प्रदाय प्रवर्तक आचार्य (ओराण् वऴि गुरू परंपरा)

  1. श्रीमन् नारायण (श्री रंगनाथ /पॆरिय पॆरुमाळ)
  2. श्री महालक्ष्मी (श्री रंगनायकी/पॆरिय पिराट्टी)
  3. सेनै मुदलियार् (श्री विष्वक्सेन)
  4. श्री शठकोप स्वामी (नम्माऴ्वार्)
  5. श्रीमन् नाथमुनी (नाथमुनीगळ्)
  6. श्री पुंडरिकाक्ष (उय्यकॊण्डार्)
  7. श्री राम मिश्र (मणक्काल् नम्बी)
  8. श्री यमुनाचार्य (आळवन्दार्)
  9. महापूर्ण स्वामी (पेरिय नम्बी)
  10. श्री रामानुजाचार्य (एम्पेरुमानार्)
  11. श्री गोविन्द पेरुमाळ् (एम्बार्)
  12. पराशर भट्टर्
  13. वेदान्ती जीयर् (नन्जीयर्)
  14. कलिवैरी दास (नम्पिळ्ळै)
  15. श्री कृष्णपाद (वडक्कुत् तिरुवीधीप्पिळ्ळै)
  16. पिळ्ळै लोकाचार्य
  17. श्री शैलेश स्वामी (तिरुवाय्मोऴिप्पिळ्ळै)
  18. श्री वरवरमुनि (अऴगिय मणवाळ मामुनिगळ्) 

आऴ्वार् आणि इतर अनेक आचार्य देखील आमच्या श्रीवैष्णव गुरू परंपरेचे भाग मानले जातात.

आऴ्वारांचा अचूक क्रम याप्रमाणे आहे:

  1. सारो योगी (पॊय्गै आऴ्वार्)
  2. भूत योगी (भूतत्ताऴ्वार्)
  3. महताह्वय योगी (पेयाऴ्वार्)
  4. भक्तिसार योगी (तिरुमऴिसै आऴ्वार्)
  5. श्री शठकोप स्वामी (नम्माऴ्वार्)
  6. मधुरकवि आऴ्वार्
  7. श्री विष्णुचित्त स्वामी (पॆरियाऴ्वार्)
  8. गोदाम्बा (आण्डाळ्)
  9. कुलशेखर आऴ्वार् 
  10. भक्ताङ्घ्रिरेणु (तॊण्डरडिप्पॊडि आऴ्वार्)
  11. मुनिवाहन स्वामी (तिरुप्पाणाऴ्वार्)
  12. परकाल स्वामी (तिरुमङ्गै आऴ्वार्) 

आचार्य त्यांच्यामध्ये पुढील आचार्यांचा (जे ओराण् वळि गुरू परंपरेत समाविष्ट नाहीत) अंतर्भाव होतो (परंतु ही सूची एवढ्यापुरतीच मर्यादित नाही):

  1. सॆल्व नम्बि
  2. कुरुगै कावलप्पन्
  3. तिरुक्कण्णमङ्गै आण्डान् 
  4. तिरुवरङ्गप्पॆरुमाळ् अरयर्
  5. गोष्ठीपूर्ण स्वामी (तिरुक्कोष्टियूर् नम्बि)
  6. श्री शैलपूर्ण (पेरिय तिरुमलै नम्बि)
  7. मालाधार (तिरुमालै आण्डान्) 
  8. कांचिपूर्ण (तिरुक्कच्चि नम्बि)
  9. माऱनेरि नम्बि
  10. कूरेश (कूरत्ताऴ्वान्)
  11. दाशरथी (मुदलियाण्डान्)
  12. देवराज मुनि (अरुळाळप्पॆरुमाळ् ऎम्पॆरुमानार्)
  13. श्री बालधन्वि गुरु (कोयिल् कोमाण्डूर् इळैयविल्लि आच्चान्)
  14. प्रणतार्त्तिहर आचार्य (किडाम्बि आच्चान्)
  15. आन्ध्रपूर्ण स्वामी (वडुग नम्बि)
  16. वङ्गिपुराधीश (वङ्गिपुरतु नम्बि)
  17. रामक्रतृनाथार्य (सोमासि आण्डान्)
  18. धनुर्दास (पिळ्ळै उऱङ्गाविल्लि दासर्)
  19. कुरुगेश (तिरुक्कुरुगैप्पिरान् पिळ्ळान्)
  20. श्रीरङ्ग नारायण जीयर् (कूर नारायण जीयर्) 
  21.  विष्णुचित्त (ऎङ्गळाऴ्वान्)
  22. अनन्तार्य (अनन्ताऴ्वान्)
  23. रङ्गनाथगुरु (तिरुवरङ्गतु अमुदनार्)
  24. नडातूर् अम्माळ्
  25. वेदव्यास भट्टर्
  26. श्रुत प्रकाशिक भट्टर् (सुदर्शन सूरि)
  27. श्री कृष्ण (पॆरियवाच्चान् पिळ्ळै)
  28. माधवाचार्य (ईयुण्णि माधव पॆरुमाळ्)
  29. पद्मनाभाचार्य (ईयुण्णि पद्मनाभ पॆरुमाळ्)
  30. कोलवराहार्य (नालूर् पिळ्ळै)
  31. देवराजाचार्य (नालूराच्चान् पिळ्ळै)
  32. मध्यवीधी भट्टर् (नडुविल् तिरुवीधी पिळ्ळै भट्टर्)
  33. पश्चात् सुंदर देशिक (पिन्बऴगिय पॆरुमाळ् जीयर्)
  34. रम्यजामातृदेव (अऴगिय मणवाळ पॆरुमाळ् नायनार्)
  35. सुंदर वरराजाचार्य (नायनाराच्चान् पिळ्ळै)
  36. सुंदरजामातृ मुनि (वादि केसरी अऴगिय मणवाळ जीयर्)
  37. कूर कुलोत्तम दास
  38. नारायण दास (विळाञ्जोलै पिळ्ळै)
  39. वेदान्ताचार्य 
  40. जनन्याचार्य (तिनारायणपुरतु आय् जनन्याचार्य)

श्री वरवरमुनि यांच्या काळात (आणि त्यानंतर) आमच्या संप्रदायामध्ये अनेक वैभवशाली आचार्य होऊन गेले, ज्यांच्यामध्ये पुढील आचार्यांचा अंतर्भाव होतो (परंतु ही सूची एवढ्यापुरतीच मर्यादित नाही):

  1. तोताद्री जीयर् (पॊन्नडिक्काल् जीयर्)
  2. वरद नारायण गुरू (कोयिल् कन्दाडै अण्णन्)
  3. वदिभीकर गुरू (प्रतिवादी भयङ्करम् अण्णन्)
  4. भट्टनाथ मुनि (परवस्तु पट्टर्पिरान् जीयर्)
  5. देवराज गुरू (ऎऱुम्बि अप्पा)
  6. अप्पिळ्ळै
  7. अप्पिळ्ळार्
  8. श्रीनिवास गुरू (कोयिल् कन्दाडै अप्पन्)
  9. श्रीपॆरुम्बूतूर् आदि यतिराज जीयर् 
  10. अप्पाचियारण्णा 
  11. लोकार्य मुनि (पिळ्ळै लोकम् जीयर्)
  12. तिरुमऴिसै अण्णावप्पङ्गार्
  13. अप्पन्‌ तिरुवेङ्कट रामानुज ऎम्बार् जीयर्  आणि अनेक 

पुढील लेखांमध्ये, आपण या आचार्यांच्या चरित्रांचे यथाशक्ती अध्ययन करू.

अडियेन् वैष्णवी रामानुज दासी

आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/17/introduction-contd-english/

संगृहीत – https://acharyas.koyil.org/

प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org