श्री पुण्डरिकाक्ष (उय्यक्कॊण्डार्)

श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः

गूरूपरंपरा उपक्रमणिका

<< श्रीमन् नाथमुनी

श्री नाथमुनि स्वामी यांच्या नंतर संप्रदाय आणि ओराण् वऴि गूरूपरंपरेत पुढचे आचार्य श्री उय्यक्कोण्डार् स्वामी यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ.

तिरुनक्ष्त्र –  चैत्र मास कृतिका नक्षत्र

अवतार स्थळ –   तिरुवेळ्ळरै

आचार्य – श्रीमन् नाथमुनि

शिष्यगण – मणक्काल् नम्बि , तिरुवल्लिकेणि  पाण् पेरूमाळ् अरैयर् , सेट्टलूर् सेन्डलन्गार् दासर् , श्री पुण्डरिक दासर् , गोमठम् तिरुविण्णकरप्पन् , पेरूमाळ् नन्गै

उय्यक्कॊण्डार् (पुण्डरिकाक्ष स्वामी) यांचा जन्म तिरुवेळ्रळरै (श्वेतगिरी) येथे झाला. त्यांच्या पालकांनी त्यांना तिरुवेळ्ळरै एम्पेरुमानांच्या (भगवंत) नावावरून (पुण्डरिकाक्ष) नाव दिले. त्यांना पद्माक्षर स्वामी या नावाने सुद्धा ओळखले जाते, पण जास्त करून त्यांना उय्यक्कॊण्डार् या नावाने प्रसिद्धी मिळाली.

नाथमुनि स्वास्वामींच्या शिष्यांमध्ये, कुरुगै कावलप्पन् सोबत त्यांना सुद्धा प्रमुख मानले जाते. नाथमुनि, श्री शठकोप स्वामी (नम्माऴ्वार्) यांच्या अनुग्रहाने दिव्य ज्ञान मिळाल्यानंतर, काट्टूमन्नार् कोविलकडे जातात आणि आपल्या सम्प्रदायाचे प्रचार-प्रसार करतात. ते आपल्या शिष्य कुरुगै कावलप्पन् यांना अष्टांग योगाचे (कुठलाही शारीरिक क्रियाकलाप न करता, सतत भगवद अनुभवात राहण्याचे) उपदेश करतात. जेव्हा नाथमुनि उय्यक्कोण्डार् यांना अष्टांग योग शिकण्याची त्यांची आवड आहे का हे विचारतात, तेव्हा ते उत्तर देतात की “पिणम् किडक्क मणम् पुण्णरळामो”, म्हणजे जिथे संसारिक अज्ञानामुळे लोक भौतिक जगात दुःखी आहेत, तिकडे ते कशाप्रकारे आनंदाने भगवद् गुण अनुभवू शकतात. हे ऐकून नाथमुनि खूप आनंदित होतात आणि त्यांच्या उदारतेचे कौतुक करतात. नाथमुनि त्यांना आणि कुरुगै कावलप्पन् यांना आदेश देतात की ईश्वर मुनि यांच्या पुत्रांना (स्वतःच्या नातवंडांना) जे लवकरच प्रकट होणार आहेत, त्यांना अरुळिचेयळ् (दिव्यप्रबंध) आणि अष्टांग योगाची शिकवण देऊन निपुण कराल.

नाथमुनिं नंतर, उय्यक्कोण्डार् दर्शन शास्त्राचे प्रचारक बनतात (श्रीवैष्णव संप्रदायाचा प्रचार स्वतः हाताळत सत्संप्रदायाची रक्षा करतात) आणि आपल्या शिष्यांना हे दिव्य ज्ञान शिकवतात. परमपदाच्या मार्गावर जाण्या आधी श्री उय्यक्कोण्डार् स्वामी मणक्काल नम्बि (राममिश्र स्वामी) यांना सांगतात की त्यांच्या नंतर, नाथमुनि स्वामींना दिलेले वचन त्यांनी पूर्ण करावे. हे वचन यामुनाचार्य स्वामींना, नाथमुनि स्वामींच्या इच्छेनुसार, संपूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राममिश्र स्वामीजींवर सोपवली आणि त्यानंतर वैकुंठ गमन केले.

उय्यक्कोण्डार् स्वामींचे तनियन्

नमः पंकज नेत्राय नाथः श्री पाद पंकजे ।
न्यस्तसर्वभराय अस्मद्कुल नाथाय धीमते ॥

गूरूपरंपरेतील पुढील आचार्य श्री स्वामी मणक्काल नम्बी यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती पुढील भागात दिली जाईल.

आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/24/uyyakkondar-english/

संगृहीत – https://acharyas.koyil.org/

प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org

Leave a Comment