श्री सेनै मुदलियार् (श्री विष्वक्सेन)

श्रीः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः श्री वानाचलमहामुनये नमः

गूरूपरंपरा

ओराण् वऴि गुरुपरंपरेनुसार, श्री पेरिय पेरुमाळ् आणि श्री पेरिय पिराट्टि यांच्यानंतर श्री सेनै मुदलियार् (श्री विष्वक्सेन) हे या परंपरेतील तिसरे आचार्य आहेत. श्री विष्वक्सेन हे भगवान श्रीमन्नारायणांचे सेनापती आहेत.

  • श्री सेनै मुदलियार् (श्री विष्वक्सेन)
विष्वक्सेन, तिरुवल्लिकेणि


तिरुनक्षत्र
: ऐप्पसि (आश्विन महिना), पूराडम् (पूर्वाषाढा)
ग्रंथ: विष्वक्सेन संहिता

श्री विष्वक्सेन हे नित्यसूरी आहेत. ते भगवान श्रीमन्नारायणांचे प्रधान सेनापती आहेत. भगवंतांच्या आज्ञेनुसार ते नित्यविभूती आणि लीलाविभूती या उभय विभूतींचे कार्य व व्यवस्थापन सांभाळतात. श्री विष्वक्सेन यांना सेनै मुदलियार्, सेनाधिपती, वेत्रधर, वेत्रहस्तर इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांच्या पत्नीचे नाव सूत्रवती आहे. त्यांना शेषासनर् असेही म्हटले जाते, कारण भगवंतांचा शेषप्रसाद सर्वप्रथम ज्यांना अर्पण केला जातो, असे ते पहिले नित्यसूरी आहेत.

आपल्या पूर्वाचार्यांच्या मते, श्री पेरिय पिराट्टि (श्री महालक्ष्मी) या श्री विष्वक्सेनांच्या आचार्या आहेत, तसेच आऴ्वार् संतही त्यांचे शिष्य झाले आहेत. भगवंतांनी नित्य-लीलाविभूती कार्यांचे नियंत्रण श्री विष्वक्सेनांकडे सोपवले आहे. भगवंत आपल्या नित्य स्वधाम वैकुंठामध्ये आपले भक्तगण आणि नित्यसूरी यांच्या कैंकर्याचा (भक्तिमय सेवेचा) आनंद घेत असतात. पूर्वाचार्यांच्या मतानुसार, श्री विष्वक्सेन हे मंत्र्याची भूमिका निभावतात आणि भगवंत राजकुमाराची भूमिका निभावतात.

श्री यामुनाचार्यांनी केलेले वर्णन

श्री यामुनाचार्यांनी आपल्या स्तोत्ररत्नातील ४२व्या श्लोकामध्ये भगवान श्रीमन्नारायण आणि विष्वक्सेन यांच्यातील संबंधाचे सुंदर वर्णन केले आहे—

त्वदीय भुक्तोज्झित शेष भोजिना त्वया निसृष्टात्मभरेण यद्यथा ।
प्रियेण सेनापतिना न्यवेदि तत् तथाSनुजानन्तमुदारवीक्षणैः ॥


या श्लोकामध्ये, श्री यामुनाचार्य भगवंतांना संबोधित करून, श्री विष्वक्सेनांची स्तुती करतात. भगवंतांच्या उभय साम्राज्याचे—नित्यविभूती आणि लीलाविभूतीचे—कार्य श्री विष्वक्सेनांच्या नियंत्रणाखाली आहे आणि भगवंत त्या व्यवस्थेचे अवलोकन करून आनंद घेतात, असे येथे दर्शविले आहे.

भावार्थ (संक्षिप्त)
श्री यामुनाचार्य सांगतात की, श्री विष्वक्सेन हे भगवान श्री पेरुमाळांच्या (श्रीमन्नारायण) आज्ञेने त्यांच्या उभय साम्राज्याचे—नित्यविभूती व लीलाविभूतीचे—नियंत्रक आहेत. भगवंतांचा शेषप्रसाद सर्वप्रथम त्यांनाच प्राप्त होतो आणि नित्यसूरी तसेच लीलाविभूतीतील जीव—या दोन्हींचेही ते प्रिय आहेत.

श्री विष्वक्सेन भगवंतांच्या केवळ कटाक्षातूनच त्यांच्या इच्छेचा अर्थ समजून घेऊन त्यांचे कार्य अत्यंत कुशलतेने पार पाडतात. भगवंतांच्या नेत्रकटाक्षातूनच त्यांना भगवंतांची इच्छा समजते आणि त्या इच्छेनुसार ते आपले कैंकर्य तत्परतेने पार पाडतात.

श्री विष्वक्सेन यांचे तनियन्

श्री रंगचँद्रमसम् इन्द्रियाविहर्तुम् विन्यस्यविस्वचिद चिन्नयनाधिकारम् ।
यो निर्वहत्य निसमन्गुळि मुद्रयैव सेनान्यमन्य विमुकास्तमसि श्रियाम ॥


श्री विष्वक्सेन ज्या प्रकारे अखंडपणे भगवद्-कैंकर्यात संलग्न राहतात, त्याचप्रमाणे आपण सर्व संप्रदाय अनुयायी भगवद्-भक्तांनी श्री विष्वक्सेनजीं प्रार्थना करावी की, आम्हालासुद्धा सदैव भगवद्-कैंकर्यात संलग्न राहण्याची सेवा आणि संधी प्राप्त होवो.

पुढील लेखात आपण प्रपन्न जन कुटस्थर — श्री नम्माऴ्वार् यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

अडियेन् निखिलेश्वर रामानुज दास​

आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/18/senai-mudhaliar-english/

संगृहीत – https://acharyas.koyil.org/

प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org

Leave a Comment