पूर्व लेखनात (विष्वकसेन) आपण विष्वकसेन यांचे वैभव बघितले. आता आपल्या संप्रदाय प्रवर्तक आचार्य परंपरेत पुढच्या आचार्यांबद्दल बघूया.

तिरुनक्षत्रम् (अवतार दिवस) – वैगासी (तमिऴ् चे वैशाख महिना), विसागम् (विशाखा नक्षत्र)
अवतार स्थळ – कुरुगापुरी (आऴ्वार् तिरुनगरी)
आचार्य – विष्वकसेन
शिष्य – मधुरकवि आऴ्वार्, श्रीमन्नाथमुनि (नाथमुनिगळ्)
हे अनेक नावांनी (तमिऴ् व संस्कृत भाषेत) प्रसिद्ध आहे जसे – माऱन्, सटगोपन् (शठकोप), पराङ्गुसन् (पराङ्कुश), वकुळाभरणन् (वकुळाभरण), वकुळाभिरामन् (वकुळाभिराम), मगिऴ्माऱन्, सटजित (शठजित), कुरुगूर् नम्बि इत्यादी.
श्री शठकोप सूरी (नम्माऴ्वार्) यांचा जन्म तिरुकुरुगूर् (कुरुगापुरी, आऴ्वार् तिरुनगरी) येथे कारि आणि उडयनङ्गै या दाम्पत्याचा पुत्र म्हणून झाला. कलियुगचा आरंभ होऊन काहीच दिवसात ते जन्माला आले. भगवत् गीता मध्ये कृष्णाने जाहिर केले की “अनेक अनेक जन्मानंतर एक जीव या निर्णयावर पोहोचतो की सगळे काही एकमेव वासुदेवाचे (स्वयं कृष्ण) आहे. आणि असे ज्ञानी सापडणे खूप दुर्मिळ आहेत.” आपल्या जीवन आणि कार्यावरून शठकोप सुरींनी प्रत्यक्ष केले की ते असे एक ज्ञानी होते जे भगवंतांना अति प्रिय होते. आपल्या संपूर्ण जीवन काळात (जे या संसारात फक्त ३२ वर्षांचे होते), ते एक चिंचेच्या वृक्षाखाली (तिरुपुळियाऴ्वार्) राहिले व सदैव श्रीमन्नारयणाचे ध्यान करत योग करत होते. आपल्या पूर्वाचार्यांच्या व्याख्यानात असे म्हटले जाते की कुरुगूर् शब्द आपण जेव्हा ऐकतो त्याच क्षणी दक्षिण दिशेकडे (आऴ्वार् तिरुनगरी/कुरुगूर् शिक्षण भारतात आहे) अंजली केली पाहिजे.
(अनुवादक टिप्पणी: शठकोप स्वामींची काव्य रचना तिरुवाय्मोऴि (सहस्रगीति) यातील प्रत्येक दशकाच्या शेवटच्या पसुरम मध्ये (श्लोक) सामान्यतः त्यांची नाव मुद्रित असते व त्यांच्या नावाला त्यांचे अवतार स्थळ कुरुगूर् शब्द प्रत्यय येतो.)
शठकोप सूरींना “प्रपन्न जन कूटस्थ” (प्रपन्न जन कूटस्तर्) म्हणून गौरविण्यात येते – अर्थात, प्रपन्नांच्या गटात मूळ पुरुष. यामुनाचार्यांकडून (आळवन्दार्) त्यांना “वैष्णव कुळपति” नावाने सुद्धा गौरविण्यात येते – वैष्णव कुळाचा अधिपती. यामुनाचार्यांनी आपले ‘स्तोत्र रत्नम्’ मध्ये, ५व्या श्लोकात अशी स्पष्ट रूपाने घोषित करतात कि त्यांच्या शिष्यांसाठी वकुळाभिराम (शठकोप सूरी) यांचे श्रीचरणच सर्वस्व (माता, पिता, पुत्र, संपत्ती आदी) आहेत.

रामानुजाचार्य यांना “माऱन् अडि पणिन्दु उय्न्दवन्” असे गौरव केला जातो, अर्थात जे शठकोप सूरींच्या चरणी (माऱन्) शरण येऊन उद्धारले.
कलिवैरिदास (नम्पिळ्ळै) पूर्वाचार्यांच्या ग्रंथांच्या आधारे, त्यांच्या ‘ईडू व्याख्यान अवतारिका’ आणि ‘तिरुविरुत्तम व्याख्यान अवतारिका’ मध्ये हे सिद्ध करतात की, श्री शठकोप सूरी यांची भगवान एम्पेरुमान (भगवान विष्णू) यांनी स्वतः लीला विभूतीमधून (या भौतिक जगातून) निवड केली होती; जेणेकरून त्यांनी भगवंतांच्या महिमेचे गायन आणि अनेक बद्ध जीवात्म्यांना श्रीवैष्णव पंथात समाविष्ट करून घ्यावे. कलिवैरिदास हे स्वतः श्री शठकोप सूरी यांच्या शब्दांच्या आधारे सिद्ध करतात. भगवंत आपल्या स्वतःच्या इच्छेने श्री शठकोप सूरी यांना शुद्ध ज्ञान प्रदान करतात, ज्यामुळे आऴ्वारांना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ स्पष्टपणे स्वतःच्या डोळ्यांसमोर दिसू लागतो.
श्री शठकोप सूरी आपल्या साहित्यात अनेक ठिकाणी म्हणतात की, ते अनादी काळापासून या संसारात (भौतिक जगात) दुःख सोसत होते. ते असेही म्हणतात की ते या संसारात एका क्षणासाठीही राहू शकत नाहीत – त्यांच्यासाठी या संसारात राहणे म्हणजे पायात पादत्राणे नसताना लालभडक तापलेल्या जमिनीवर उभे राहण्यासारखे आहे. ‘तिरुवाय्मोऴी’ च्या अगदी पहिल्याच पासुरममध्ये (श्लोकात) ते सांगतात की, त्यांना एम्पेरुमान यांनी दिव्य ज्ञानाचा आशीर्वाद दिला होता. यावरून आपण सहज समजू शकतो की ते आधी संसारी (बद्ध जीवात्मा) होते आणि नंतर एम्पेरुमान यांनी त्यांना दिव्य ज्ञानाची देणगी दिली. हाच तर्क इतर आऴ्वारांनाही लागू होतो, ज्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- श्री शठकोप सूरी यांना ‘अवयवी’ (पूर्ण) मानले जाते आणि इतर सर्व आऴ्वारांना (अर्थात आण्डाळ्/गोदा देवींना सोडून) ‘अवयव’ (त्यांचे भाग) मानले जाते.
- इतर आऴ्वारांनीही आपल्या साहित्यातही हीच गोष्ट सांगितली आहे की, ते संसारात कष्ट भोगत होते आणि एम्पेरुमान यांनी त्यांना दिव्य ज्ञानाचा आशीर्वाद दिला.
श्री शठकोप सूरी यांनी ४ दिव्य प्रबंधम रचले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:
- तिरुविरुत्तम् (ऋग्वेद सार)
- तिरुवासिरियम् (यजुर्वेद सार)
- पेरिय तिरुवन्दादी (अथर्ववेद सार)
- तिरुवाय्मोऴी (सामवेद सार)
श्री शठकोप सूरी यांचे हे प्रबंधम चार वेदांच्या बरोबरीचे मानले जातात. त्यांना “वेदम् तमिळ चैत मारन” (वेद तमिळमध्ये आणणारा मारन) म्हणूनही ओळखले जाते – म्हणजेच ज्याने संस्कृत वेदांचे सार आपल्या तमिळ प्रबंधमांद्वारे दिले. इतर सर्व आऴ्वारांचे प्रबंधम वेदांच्या पूरक भागासारखे (जसे की शिक्षा, व्याकरण इत्यादी) मानले जातात. ‘तिरुवायमोळी’चे गौरवगान आऴ्वारांनी गायलेल्या सर्व ४००० दिव्य प्रबंधमांचे सार म्हणून केले जाते. आपल्या पूर्वाचार्यांचे सर्व ग्रंथ (व्याख्यान आणि रहस्य ग्रंथ) तिरुवायमोळीमधून घेतलेल्या ज्ञानावरच आधारित आहेत. तिरुवायमोळीवर स्वतः ५ व्याख्याने (भाष्य) आणि ‘अरुमपधम’मध्ये अधिक सविस्तर स्पष्टीकरणे आहेत.
आमचे पूर्वाचार्य हे सिद्ध करतात की, श्री शठकोप सूरी यांच्या ठायी श्रीदेवी, भूदेवी, नीलादेवी, गोपिका, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दशरथ, कौसल्या, प्रल्हाद, विभीषण, हनुमान, अर्जुन अशा अनेक महान व्यक्तींचे गुण एकत्रित होते असे मानले जाते. श्री शठकोप सूरींमध्ये या प्रत्येक व्यक्तीचे गुण होते, तर या व्यक्तींमध्ये श्री शठकोप सूरींचे केवळ काहीच गुण होते – असा त्यांचा अगाध महिमा आहे.
तिरुवाय्मोऴी ७.१०.५ – पलरडियार् मुन्बरुळिय’ – मध्ये नंपिळ्ळै श्री शठकोप सूरींचे अंतःकरण अत्यंत सुंदर रीतीने मांडतात. श्री शठकोप सूरी या पासुरममध्ये म्हणतात की, एम्पेरुमान यांनी श्री वेदव्यास, श्री वाल्मिकी, श्री पराशर आणि तमिळ भाषेत तज्ज्ञ असलेल्या मुधलाऴ्वारगळ (प्रथम तीन आऴ्वार्) सारख्या महान ऋषींऐवजी मला ‘तिरुवाय्मोऴी’ गाण्यासाठी आशीर्वाद दिला.
हे लक्षात ठेवून, आता आपण त्यांचे चरित्र पाहूया:
श्री शठकोप सूरी (ज्यांना अवयवी-पूर्ण मानले जाते आणि इतर आऴ्वारांना अवयव-भाग मानले जाते) यांचा जन्म तामिरभरणी नदीच्या काठी वसलेल्या तिरुकरुगूर येथे झाला. ही नदी गंगा, यमुना, सरस्वती इत्यादी सर्व नद्यांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. त्यांचा जन्म ‘कारी’ यांच्या पोटी झाला, जे अनेक पिढ्यांपासून ‘प्रपन्न कुलाचे’ (भगवंताला पूर्ण शरण गेलेले कुल) भाग होते. या महान व्यक्ती श्रीमन् नारायणाशिवाय इतर कोणाचीही पूजा करत नसत, जसे की तिरुमऴिसै आऴ्वारांनी “मऱन्दुम् पुऱम् तॊऴा मान्दर्” (जे विसरूनही इतर देवतांची पूजा करत नाहीत) असे स्पष्ट केले आहे. तेथे एक ‘तिरुवळुदि वळ नाडर्’ महाशय होते, ज्यांचे पुत्र अरन्ताङ्गियार्, त्यांचे पुत्र चक्रपाणियार्, त्यांचे पुत्र अच्युतर्, त्यांचे पुत्र चॆन्तामरै कण्णर्, त्यांचे पुत्र पॊऱ्-कारियार, त्यांचे पुत्र कारियार् आणि त्यांचे पुत्र श्री शठकोप सूरी होते.
या महान वैष्णव कुटुंबात, पॊऱ्-कारियार यांनी आपल्या मुलाच्या (कारी) गृहस्थाश्रमासाठी आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी वैष्णव संतती निर्माण व्हावी म्हणून एका वैष्णव मुलीचा शोध घेण्याचे ठरवले. पॊऱ्-कारी ‘तिरुवण्परिसारम्’ दिव्य क्षेत्र येथे गेले आणि त्यांनी ‘तिरुवाऴ्मार्बर्’ (जे आपल्या मुलीचे लग्न एखाद्या वैष्णवाशी करून वैष्णव संतती मिळवू इच्छित होते) यांची भेट घेतली आणि आपली मुलगी ‘उडैयनङ्गै’ हिचा विवाह कारियार् यांच्याशी करून देण्याची विनंती केली. तिरुवाऴ्मार्बर् यांनी हे मान्य केले आणि कारियार् व उडैयनङ्गै यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कारियार् आणि उडैयनङ्गै दोघेही तिरुवण्परिसारम् येथील तिरुवाऴ्मार्बन् भगवंताची पूजा करून तिरुकरुगूर्ला परतले. ते परत आले तेव्हा तिरुकरुगूर् मधील प्रत्येकाने त्यांचे अत्यंत भक्तीने आणि उत्साहाने स्वागत केले, जसे की श्रीरामाने सीतेशी विवाह करून तिला मिथिलेहून अयोध्येला आणले होते तेव्हा झाले होते.
काही काळानंतर, कारियार् आणि उडैयनङ्गै यांनी तिरुवण्परिसारम् गावाला भेट दिली आणि परतताना त्यांनी ‘तिरुकरुंगुडी’ला भेट देऊन ‘नम्बि एम्पेरुमान’ची पूजा केली. त्यांनी संतानासाठी प्रार्थना केली आणि नम्बिने त्यांना वचन दिले की ते स्वतः त्यांच्या मुलाच्या रूपात जन्माला येतील. ते आनंदाने तिरुकरुगूर्ला परतले आणि काही दिवसांनी उडैयनङ्गै गरोदर राहिल्या. कलियुगाच्या सुरुवातीच्या ४३ व्या दिवशी, भगवंताच्या आदेशानुसार, श्री शठकोप सूरींनी स्वतः “तिरुमालाल् अरुळप् पॆट्र चटकोपन्” – (म्हणजेच श्रीमन् नारायणाचा दिव्य आशीर्वाद लाभलेले शठकोप) असे घोषित केल्याप्रमाणे, बहुधान्य वर्षात (काही ठिकाणी प्रमाधी वर्ष म्हटले आहे), वसंत ऋतूत, वैकासी (वैशाख) महिन्यात, शुक्ल पक्षात, पौर्णिमा तिथीला आणि विशाखा नक्षत्रात ‘विष्वक्सेन’ यांचे अंश म्हणून अवतार घेतला.
अऴगिय मणवाळ पेरुमाळ् नायनार् (रम्यजामातृदेव) यांनी आपल्या ‘आचार्य हृदयम’ मध्ये घोषित केल्याप्रमाणे, येथे असे म्हटले आहे की – “आदित्य रामदिवाकर अच्युत भानुक्कळुक्कु नीङ्गाद उळ्ळिरुळ् नीङ्गी चोषियात पिऱविक्कडल् चोषित्तु विकसियात पोतिल् कमलम् मलरुम्पडी वकुळभूषण भास्करोदयम् उण्डाय्त्तु उडैयनङ्गैयागिऱ पूर्वसंध्यैयिले” (अर्थ – संसारी लोकांचे जे आंतरिक अज्ञान सूर्य (आदित्य), तेजस्वी सूर्य म्हणून गौरवलेले श्रीराम (राम दिवाकर) आणि चमकदार सूर्य म्हणून गौरवलेले श्रीकृष्ण (अच्युत भानू) यांच्या आगमनानेही दूर झाले नव्हते, श्री शठकोप सूरी (वकुळा भूषण भास्कर – श्री शठकोप सूरी रूपी सूर्य) यांच्या आगमनाने ते अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा विकास झाला, आणि हे श्री शठकोप सूरी उडैयनङ्गै यांच्या पोटी जन्माला आले.)
आऴ्वारांचे रक्षण करण्यासाठी आदिषेश दिव्य चिंचेच्या झाडाच्या रूपात (तिरुपुळियाऴ्वार्) प्रकट झाले (कारण त्यांना माहीत होते की आऴ्वार् तिरुकरुगूरच्या आदिनाथ देवाच्या मंदिराचा आश्रय घेतील).
श्री शठकोप सूरींचा तनियन्:
माता पिता युवतयस्तनया विभूतिः
सर्वम् यदेव नियमेन मदन्वयानाम् ।
आद्यस्य नः कुलपतेर्वकुळाभिरामम्
श्रिमत्तदन्घ्रि युगळम् प्रणमामि मूर्ध्ना ॥
पुढील लेखात आपण श्री नाथमुनींचा जीवनप्रवास बघू.
अडियेन् वैष्णवी रामानुज दासी
आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/18/nammazhwar-english/
संगृहीत – https://acharyas.koyil.org/
प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org