श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः श्री वानाचल महामुनये नमः
पूर्व लेखनात आपण (https://acharyas.koyil.org/index.php/2026/07/04/introduction-2-marathi/) गुरू परंपरेबद्दल चर्चा केली. आता, आपण सम्प्रदाय प्रवर्तक आचार्य (ओराण् वऴि आचार्य) परंपरेचा आरंभ करुया. ओराण् वऴि म्हणजे एक व्यक्तीकडून दुसरी व्यक्तीकडे परंपरागत पद्धतीने ज्ञानाचे संक्रमण. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, यथार्थ ज्ञान रहस्य त्रयम् हेच आहे आणि आपल्या ओराण् वऴि परंपराने या ज्ञानाचा काळजीपूर्वक संक्रमण केला आहे.

- पॆरिय पॆरुमाळ् (श्रीमन्नारयण)

तिरुनक्षत्रम् (अवतार दिवस) – आवणी (तमिळ् चा श्रावण महिना), रोहिणी नक्षत्र
कार्य – भगवद्गीता, श्रीशैलेश दयापात्रं ध्यान श्लोक आदि
आपले सम्प्रदाय प्रवर्तक आचार्यांची परंपरा थेट पॆरिय पॆरुमाळ् पासून आरंभ होते. या पूर्वी बघितल्या प्रमाणे, आपल्या असीमित कृपेमुळे श्रीयःपतिंनी (भगवान श्रीमन्नाराण/ऎम्पेरुमान्) प्रथमाचार्यांची पदवी घेतली. त्यांनी रहस्य त्रयम् चा अर्थ पॆरिय पिराट्टि (श्रीमहालक्ष्मी) यांना विष्णु लोकात प्रकट केला.
भगवंत हे एकमेव स्वतंत्र आणि शेषि (स्वामी) आहेत. इतर सर्व परतंत्र आणि शेष (दास/सेवक) आहेत. ते प्रथमाचार्यांची पदवी स्वयं आपल्या इच्छेने घेतात. ते सर्वज्ञ, सर्वशक्त व सर्वव्याप्त आहेत. त्यांची
निःसंशयास्पद क्षमता असल्या कारणाने मोक्षाची इच्छा असलेल्या जीवात्मांना ते मोक्ष प्रदान करू शकतात.
पॆरिय पॆरुमाळ् (श्रीरंगनाथ स्वामी, स्वयं श्रीमन्नारयण) आधी परमपद (वैकुंठ) येथून ब्रह्मा यांच्याकडे सत्यलोक मध्ये श्रीरंग विमानासह अवतरित झाले आणि सत्यलोकात ब्रह्मा द्वारे आराध्य दैवत म्हणून राहिले. त्यानंतर इक्ष्वाकु वंशाच्या एका राजाने ब्रह्मा कडून यांचे विग्रह मागितले व आपल्या नगरीत अयोध्येत घेऊन आले. तेव्हापासून हे श्रीरंगनाथ रघुकुल राजांचे कुलदैवत ह्या रुपात पूजले गेले. श्री रामचंद्रांची लंकेवर विजयी होऊन, राज्याभिषेक झाल्यावर विभीषणाने ह्या विग्रहाला रामचंद्रांकडे मागून आपले राज्य असलेल्या लंकेला घेऊन जात होते. परंतु भगवंतांची इच्छा वेगळी होती. विभीषण लंकेला जाताना मार्गावरील स्थित कावेरी मध्ये एका छोटे द्वीप श्रीरंगम् येथे थांबले, व त्याचे सौंदर्य बघून तिथेच दक्षिणाभिमुख बिराजले. म्हणून म्हटलं जातं – “वण्डिनम् उरुलुम् चोलै, मयिलिनम् आळुम् चोलै, कॊण्डल् मीदणवुम् चोलै, कुयिलिनम् कूवुम् चोलै”.
श्री पॆरिय पॆरुमाळ् ध्यान श्लोक (तनियन्) –
श्रीस्थनाभरणं तेजः श्रीरङ्गेशमाश्रये |
चिंतामणि मिवोत्वान्तम् उत्सङ्गे अनन्तभोगिनः ||
- श्री पेरिय पिराट्टी (श्री महालक्ष्मी)

तिरुनक्षत्रम् – पङ्गुनि (तमिळ चे फाल्गुन मास), उत्रम् (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र)
श्रियःपति महालक्ष्मी यांना द्वयमहामंत्राचा उपदेश वैकुंठ लोकात दिला.
एका आचार्यांकडे कृपा (कष्ट सहन करणाऱ्या जीवांबद्दल दया), पारतंत्र्यम् (देवावर पूर्ण अवलंबित्व) आणि अनन्यार्हत्वम् (केवळ श्रीमन्नारयणांचाच असण्याचा अनन्य अधिकार) हे गुण असायला हवेत. श्री महालक्ष्मी या ३ गुणांचे मूर्तिमंत रूप असल्याने आपल्या संप्रदाय प्रवर्तक गुरु परंपरेत दुसऱ्या आचार्य म्हणून हक्काने विराजमान आहेत. त्या अशा आहेत ज्या प्रत्यक्षात इतर सर्व आचार्यांना त्यांच्या आचरणासाठी प्रेरणा देतात.
श्रीवचन भूषणम् मध्ये पिळ्ळै लोकाचार्यांनी स्पष्ट केले आहे की, सीता पिराट्टी म्हणून सामोऱ्या गेलेल्या ३ विरहांच्या प्रसंगात त्यांनी हे ३ गुण प्रदर्शित केले आहेत.
पहिले, जेव्हा रावण तिला जबरदस्तीने लंकेत नेतो, तेव्हा ती तिच्या परम कृपेमुळे हे घडू देते – कारण जोपर्यंत ती लंकेत जात नाही, तोपर्यंत देवस्त्रियांची (देवांच्या पत्नींची) सुटका होणार नाही. संपूर्ण विश्वाची माता असल्याने – ती रावणाचीही माता आहे – तिच्या याच मातृत्वाच्या भावनेतून ती रावणाचे गैरवर्तन सहन करते.
दुसरे, जेव्हा ती गर्भवती असते, तेव्हा श्रीराम आपल्या नागरिकांच्या टिप्पणीच्या आधारे तिला राज्याचा त्याग करण्यास सांगतात, तेव्हा ती त्याचा पूर्ण स्वीकार करते कारण ती स्वतःला भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून (पारतंत्र्यम्) मानते आणि भगवंत जे काही सांगतील ते ती स्वीकारेल.
तिसरे, जेव्हा ती वनवासाहून परत आल्यानंतर श्रीरामचंद्रांचा कायमचा त्याग करून परमपदासाठी प्रस्थान करते, हे सिद्ध करण्यासाठी की ती केवळ आणि केवळ त्याच्यावरच (अनन्यार्हत्वम्) हक्क ठेवून होती आणि इतर कोणावरही नाही.
अशा प्रकारे ती एका आचार्यांकडून अपेक्षित असणारे सर्व ३ गुण परिपूर्णतेने प्रकट करते.
श्री पॆरिय पॆरुमाळ् ध्यान श्लोक (तनियन्) –
नमः श्रीरङ्ग नायक्यै यत् भ्रो विभ्रम भेदतः।
ईशेशितव्य वैषम्य निम्नोन्नतम् इदं जगत् ।।
पुढील लेखात आपण विष्वकसेन यांच्या बद्दल बघू.
आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/17/divya-dhampathi-english/
संगृहीत – https://acharyas.koyil.org/
प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org